शोध बॉक्स

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

क्रिकेट आणि देश

खरं तर बरेच दिवस (!!! की महिने?) हा नवा ब्लॉग सुरू करण्याच्या विचारात होतो, पण कधी वेळ नाही म्हणून तर कधी मूड नाही म्हणून राहून जात होता.  शेवटी विचार केला की बनवू तरी, कदाचित लिखाण मग आपोआप होवू लागेल.  मग नाही हो करत करत समीर नाईकांचे अथक प्रयत्न एकदाचे फळाला येतायत आणि हा ब्लोग सुरु होतोय. :) 

सध्यातरी माझ्याच मी मराठी वरील पूर्वप्रकाशित पोस्ट्स नी सुरुवात करतोय...


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांना नुकतीच ४० वर्षे पुर्ण झाली. आणि आता क्रिकेटचा दहावा विश्वचषकसुद्धा सुरू आहे, तोही आपल्याच घरी!

पण या खेळातील सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक असूनही आपल्यापैकी अनेक जणांना या खेळातील ८-१० देश वगळून इतर देशातील क्रिकेटबाबत काहीही माहिती नाही. याला काही प्रमाणात ICC सुद्धा जबाबदार आहे म्हणा... ICC चे संपूर्ण सदस्य असलेल्या देशांना विश्वचषकात कायम संधी आणि इतरांना मात्र पात्रता फ़ेरी, यामुळे आपल्या सारख्या देशांना पात्रता फ़े‍र्‍यांबाबत काहीच माहिती होत नाही. आणि मोठे/महत्वाचे देश खेळत नसल्यामुळे या फ़ेर्‍यांना फ़ुटबॉलच्या पात्रता फ़ेर्‍यांइतके महत्वसुद्धा मिळत नाही. हे कमी म्हणून की काय ICC फ़क्त पहिल्या १०-१२ संघांचेच गुण आणि क्रमांक थेट जाहीर करते.
म्हणून मग यावेळेस ठरवलंच होतं की इतर संघ आणि त्यांचे जागतिक क्रमवारीतील स्थान हे शोधून काढायचंच. आणि काही प्रयत्नांनंतर त्यात यशसुद्धा मिळालं! जगात १०५ संघ ICC शी थेट संलग्न आहेत. या संघांना तब्बल ८ + १ (आंतरराष्ट्रीय) गटांमध्ये विभागलं जातं आणि त्यांच्या खेळातील प्रगतीनुसार त्यांना वरच्या गटांमध्ये पाठवलं जातं. १ल्या विभागातील संघ पात्रता फ़ेरीत खेळून विश्वचषकात आपली जागा निश्चित करतात आणि ४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची पात्रता मिळवतात. याबाबत पुन्हा कधीतरी सविस्तर बोलूच.
या सर्व संघांपैकी पहील्या ४० संघांची एकदिवसीय सामन्यांसाठीची क्रमवारी पुढील प्रमाणे.
१. ऑस्ट्रेलिया (विश्वचषक २०११ साठी पात्र)
२. भारत (विश्वचषक २०११ साठी पात्र)
३. श्रीलंका (विश्वचषक २०११ साठी पात्र)
४. दक्षिण आफ़्रीका (विश्वचषक २०११ साठी पात्र)
५. इंग्लंड (विश्वचषक २०११ साठी पात्र)
६. पाकीस्तान (विश्वचषक २०११ साठी पात्र)
७. न्यूझीलंड (विश्वचषक २०११ साठी पात्र)
८. कॅरीबिअन आयलंडस (विश्वचषक २०११ साठी पात्र)
९. बांग्लादेश (विश्वचषक २०११ साठी पात्र)
१०. आयर्लंड (विश्वचषक २०११ साठी पात्र) (२०१३ पर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास पात्र)
११. झिंबाब्वे (विश्वचषक २०११ साठी पात्र)
१२. नेदरलॅंडस (विश्वचषक २०११ साठी पात्र) (२०१३ पर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास पात्र)
१३. केनिया (विश्वचषक २०११ साठी पात्र) (२०१३ पर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास पात्र)
१४. अफ़गाणिस्तान
(२०१३ पर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास पात्र)
१५. कॅनडा (विश्वचषक २०११ साठी पात्र) (२०१३ पर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास पात्र)
१६. स्कॉटलंड
(२०१३ पर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास पात्र)
१७. संयुक्त अरब अमिरात

१८. नामिबिया

१९. बर्म्युडा

२०. युगांडा

२१. ओमान

२२. डेन्मार्क

२३. पापुआ न्यु गिनीआ

२४. हॉंग कॉंग

२५. युनायटेड स्टेट्स ऑफ़ अमेरीका

२६. इटली

२७. नेपाळ

२८. टांझानिया

२९. केमान आयलंडस

३०. आर्जेंटीना

३१. बहारीन

३२. सिंगापूर

३३. जर्सी

३४. फ़िजी

३५. ग्युनर्जी

३६. मलेशिया

३७. बोट्सवाना

३८. नॉर्वे

३९. नायजेरीया

४०. जपान


1 टिप्पणी:

  1. अमित ! :) अभिनंदन ! अखेर मुहुर्त लागला म्हणायचा .... ! :)
    सुरुवात केली आहेस .... आता सातत्य ठेव ........
    पहिली पोस्ट छान दिली आहेस आवडली.... !
    मागे मी तुला म्हणालो होतो ... तू ललित उत्तम लिहू शकतो... आता हे prove करायची जबाबदारी तूझी ;),[ हलवायाच्या घरावर तुळशीपत्र- परस्पर :D ]
    तुझी लेखनशैली उत्तम आहेच ... तिला आता प्रतिभेचे धुमारे फुटू दे....
    लेखनासाठी मनापासून शुभेच्छा आणि सदिच्छा ! :)

    उत्तर द्याहटवा