शोध बॉक्स

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

स्वप्नी माझ्या येशील... का?

स्वप्नं... जवळपास सर्वांचीच काही ना काही स्वप्नं असतात.  पण ती जागेपणी, हो जागेपणीच.  कारण बर्‍याच लोकांना ते जागेपणी ज्या गोष्टीला ’अमुक एक बनणं माझं स्वप्न आहे’ कींवा ’ही माझी स्वप्नसुंदरी आहे’ असं म्हणतात ती त्यांच्या स्वप्नात मात्र शक्यतो येत नाही! :)

तुम्हाला ही काही इंटरेस्टींग स्वप्ने पडली असतीलच की... म्हणजे  कधी एखादं भीतीदायक स्वप्न, कींवा कधी आपण जे करायचं नाही असं ठरवलंय तेच स्वप्नात करताना दिसणं.  एक स्वप्न तर बहूतेक सर्वजण किमान एकदा तरी अनुभवतातच, आपला स्वप्नात अचानक तोल जातो आणि आपण जागे होतो कींवा स्वप्नात कुणीतरी पोटाला गुदगुल्या केल्यात आणि तुम्हाला जाग आली?

मधे येऊन गेलेल्या इन्सेप्शन चित्रपटाने सुद्धा स्वप्न हा विषय हाताळला होता, आणि त्यात वापरली गेलेली बरीच माहिती बरोबर सुद्धा होती!  या चित्रपटाने स्वप्नांबाबतचे माझे काही जुने अनुभव जागे केले होते.

गुरुवार, १६ जून, २०११

अय स्साला... कोई शक?

उगाचच (वजन थोडं जास्त असलं तरी) मादक दिसू पहाणारी एक मुलगी रस्त्याने चालली आहे. मधेच रस्त्यात काही गुंड तिला आडवे येतात आणि त्रास देऊ लागतात. कोणीतरी तिची एक बाही फाडतो तेवढ्यात... अचानक कुठून तरी एक बाटली घरंगळत येताना दीसते (कींवा त्रास देण्यात जरा ढ असल्यामुळे मागे राहीलेल्या एका गुंडाच्या गालावर जोरदार ठोसा बसतो). सगळे त्या दिशेने बघतात. कोणी तरी विचारतो, "कौन हे बे तू?". पलीकडे तो उभा असतो...

मैं हू तुम जैसों से नफ़रत करने वाला ...
गरीबों के लिए ज्योती, गुंडो के लिए ज्वाला ,
तुझे बनाके मौत का निवाला ,
तेरे सिने में गाड दूंगा मौत का भाला .


पिटात सगळी कडे शिट्ट्या आणि टाळ्या... पुढची सगळी मारामारी नुसता गोंगाट, कुणी शर्ट फिरवतंय कुणी टोप्या उडवतंय तर कुणी चक्क नाणी पडद्यावर फेकतंय! चित्रपटाचं नाव काहीही असो जवळपास हाच सीन आणि असाच प्रतिसाद. कारण? फक्त एकच... कोई शक?

सामान्य लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या सुपरहीरोचा आज वाढदिवस...

बी-ग्रेड किंग म्हणून बॉलिवूडने एकेकाळी झिडकारलेल्या या अभिनेत्याचं सारं काही वेगळंच. बॉलिवूडच्या झगमगाटात त्याला अभिनय दाखवण्याची संधी फारशी मिळालीच नाही. लॉबींग आणि लोकप्रियतेच्या अनुसार वाटल्या जाणार्‍या फिल्मफेअर नाहीतर स्टारडस्टसारख्या पुरस्कारांनी कुठे तरी सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका कींवा सहाय्यक कलाकाराचे पुरस्कार दिले त्याला, पण त्याच्या अभिनय क्षमतेला न्याय देणार्‍या भूमिका मात्र त्या पुरस्कारांइतक्याच कमी दिल्या.

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

क्रिकेट आणि देश : आयर्लंड





आयर्लंड


सध्या विश्वचषकाच्या स्पर्धेत उतरलेल्या नवख्या संघांमध्ये सर्वाधिक गुणवत्ता असलेला संघ म्हणून आयर्लंडचा उल्लेख करावा लागेल. झिंबाब्वे आणि केनियासारख्या त्यामानाने जुन्या संघांना मागे सारुन ODI Ranking मधे दहावा क्रमांक पटकावणे आणि तो राखणे हे अर्धव्यावसायीक संघासाठी काही सोपे काम नव्हते, पण आयर्लंडने ते करुन दाखवले. हा संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यामानाने नवखा असला तरी अनोळखी नक्कीच नाही. इथे मैदानावर नुसते आयर्लंड म्हणालात तरी काही देश नकळत आपली कधीतरी सुजवली गेलेली तोंडे लपविताना दिसतील. म्हणूनच आयर्लंडला Giant Killer सुद्धा म्हणतात.

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

क्रिकेट आणि देश

खरं तर बरेच दिवस (!!! की महिने?) हा नवा ब्लॉग सुरू करण्याच्या विचारात होतो, पण कधी वेळ नाही म्हणून तर कधी मूड नाही म्हणून राहून जात होता.  शेवटी विचार केला की बनवू तरी, कदाचित लिखाण मग आपोआप होवू लागेल.  मग नाही हो करत करत समीर नाईकांचे अथक प्रयत्न एकदाचे फळाला येतायत आणि हा ब्लोग सुरु होतोय. :) 

सध्यातरी माझ्याच मी मराठी वरील पूर्वप्रकाशित पोस्ट्स नी सुरुवात करतोय...